[pune] - Sharad Pawar: शरद पवार यांची माढ्यातून माघार; लोकसभा लढणार नाहीत!

  |   Punenews

पुणे:

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नव्हे तर, नव्या पिढीला संधी देण्यासाठी निवडणूक लढविणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी हा निर्णय जाहीर केला. माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याऐवजी शरद पवार तिथून लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अचानक पवारांच्या उमेदवारीबद्दल पक्षात फेरविचार सुरू झाला. आज सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही शरद पवार यांनी घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. तेव्हाच पवार हे माढ्यातून लढणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं. पत्रकार परिषदेत त्यांनी तसं जाहीर करून टाकलं....

फोटो - http://v.duta.us/36DXDgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ob8E8AAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬