[ahmednagar] - मिवरणुकीनिमित्त वाहतुकीत बदल

  |   Ahmednagarnews

नगर : येत्या शनिवारी (२३ मार्च) तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा होणार आहे. शहरातून इम्पिरिअल चौक ते दिल्ली गेट दरम्यान मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील काही मार्गावरील वाहतूक शनिवारी दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत वळविण्यात येणार असल्याचा आदेश पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी काढला आहे.

नगर-पुणे रोडवरील पुणेकडून औरंगाबादकडे येणारी सर्व प्रकाराची वाहतूक सक्कर चौक येथून कोठी चौक मार्गे वळविण्यात येणार. तर औरंगाबादकडून पुण्याकडे जाणारी सर्वप्रकारची वाहतूक कोठी चौक ते सक्कर चौक मार्गे वळविण्यात येत आहे. इम्पिरिअल चौक, माळीवाडा चौक, पंचपीर चावडी, आशा स्केअर चौक, चाँद सुलताना हायस्कूल चौक, कराचीवाला चौक, शहाजी चौक, तेलीखुंट, नेजाती सुभाष चौक, चौपाटी कारंजा चौक, दिल्ली गेट-नीलक्रांती चौक या मार्गावर मिरवणूक कालावधीत येणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. अप्पू हत्ती चौकाकडून दिल्ली गेटकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सर्जेपुरा रोड मार्गे वळविण्यात येणार आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/irynDQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬