[navi-mumbai] - नगर मेन

  |   Navi-Mumbainews

\Bमोहिते पाटील भाजपमध्ये?\B

पिता-पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे चिरंजीव रणजितिसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत; तसेच रणजितसिंह मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार असतील.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले होते. मात्र, या वेळी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले; परंतु माढा लोकसभा मतदारसंघामधील पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. त्यामुळे या मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोहिते पाटील यांच्याबरोबर संजय शिंदे आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी दावा ठोकला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/Dx3ZBgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬