[ahmednagar] - भाजप प्रवेश हे विखेंचे स्वपक्षावर दबावतंत्र: दानवे

  |   Ahmednagarnews

अहमदनगर: राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे आणि त्यांचा मुलगा डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या कदाचित त्यांच्या पक्षासाठी दबावतंत्राचा भाग असावा. भाजपशी त्यांचा कोणताही संपर्क नाही किंवा भाजपचा नेताही त्यांच्या संपर्कात नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

खासदार दानवे औरंगाबादहून पुण्याकडे जाताना मंग‌ळवारी सकाळी अहमदनगरला थांबले होते. खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी त्यांनी तासभर थांबून गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना विखे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले.

रावसाहेब दानवे म्हणाले की, विखेंचा अद्याप भाजपशी संपर्क झालेला नाही. यासंबंधीच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांचे उमेदवारीसाठीचे दबाव तंत्र असल्याचे वाटते. एकूणच सर्वच पक्षांवर ते उमेदवारीसाठी दबाव आणत असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/WZECZwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/U3ypKgAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬