[aurangabad-maharashtra] - ‘मॉर्निग वॉक’ला गेलेल्या महिलेचा अपघाती मृत्यू

  |   Aurangabad-Maharashtranews

वाळूज महानगर : वाळूज येथे औरंगाबाद - नगर महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात एक महिला ठार, तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (चार मार्च) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली़

जुबेदा जलील शेख (४५, रा़ आण्णाभाऊ साठेनगर, वाळूज, ता़ गंगापूर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, नंदाबाई बाळू राऊत (५०, रा़ वाळूज, ता़ गंगापूर) असे जखमी महिलेचे नाव आहे. या दोघी 'मॉर्निंग वॉक'ला गेल्या होत्या. महामार्गावरून जात असताना औरंगाबादकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची घडक दिली होती. यात दोघी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना सहायक उपनिरीक्षक नारायण बुट्टे यानी घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. जुबेदा शेख यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. नंदाबाई राऊत यांच्या पायाचे हाड मोडले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातानंतर वाहन चालक वाहनासह फरार झाला आहे़ याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रीती फड या करत आहेत.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/hCXDEgAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬