[aurangabad-maharashtra] - सभापती-आयुक्तांत वाद; पालिकेत अस्थिरता

  |   Aurangabad-Maharashtranews

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

स्थायी समिती सभापती रेणुकादास (राजू ) वैद्य आणि आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यातील वादामुळे महापालिकेत अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोघांत दरी निर्माण झाल्याचा परिणाम विकास कामांवर होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.

सभापती वैद्य यांनी काही दिवसांपूर्वी १३ कलमी पत्र लिहून आयुक्तांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला आहे. कामाची गती फारच मंद असून आयुक्तांनी गती वाढवली पाहिजे, हे पत्र सकारात्मक दृष्टिने घेवून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त केली होती. या पत्राला आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत सविस्तर उत्तर देताना ९० मिनिटे मनोगत व्यक्त केले. सभापतींचे आरोप खोडून काढत केलेली कामे सांगितली. काम करूनही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवला जात असेल, तर मनोधैर्य खचते, अशी वेदना व्यक्त केली होती. आयुक्तांच्या या उत्तराला वैद्य यांनी पुन्हा एक पत्र लिहून विनाकारण शहराला बदनाम करू नका, असा इशारा दिला होता....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kXceVQAA

📲 Get Aurangabad-maharashtra News on Whatsapp 💬