[dhule] - धुळ्यात पासपोर्ट सेवा कार्यालय सुरू

  |   Dhulenews

मुंबई, नाशिकचा फेरा वाचणार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य टपाल कार्यालयातकेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते शहरात नुकतेच पासपोर्ट सेवा कार्यालयाचे उद्घाटन झाले. या वेळी महापौर चंद्रकांत सोनार, पासपोर्ट सेवा कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी टी. डी. शर्मा, टपाल कार्यालयाच्या औरंगाबाद विभागाचे निदेशक बी. अरुमुगम आदी उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे म्हणाले, यापूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी मुंबई, नाशिक येथे जावे लागत असे. त्यामुळे धुळे शहरात पासपोर्ट सुविधा केंद्र कार्यान्वित व्हावे, अशी मागणी सातत्याने होत होती. ही मागणी आता पूर्णत्वास आली आहे. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात धुळे शहरात राज्य शासनाच्या सहकार्याने वीजतारा भूमिगत टाकण्यात येतील. तसेच आगामी काळात स्वयंपाकाचा गॅस पाइपलाइनने घरापर्यंत उपलब्ध होईल. याशिवाय सीएनजी गॅसवर रिक्षा धावतील. त्यासाठी शहराच्या विविध भागात गॅस स्टेशन कार्यान्वित करण्यात येतील. त्यामुळे पर्यावरणाचेही संवर्धन होईल, असेही डॉ. भामरे यांनी सांगितले....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/5Z0lwgAA

📲 Get Dhule News on Whatsapp 💬