[jalgaon] - अंदाजपत्रकावर आज वादळी चर्चा

  |   Jalgaonnews

दुसऱ्या महासभेत भंगार बाजारसह भूसंपादनाचे विषय गाजणार

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आलेल्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या १२१७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकावर आज (दि. ५) विशेष महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. यानतंर लगेचच होणाऱ्या दुसऱ्या महासभेत भंगार बाजाराचा विषय, भूसंपादन तसेच आरोग्य अधिकारी बदलाच्या विषयावरही खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या आज (दि. ५) दोन विशेष महासभा होत आहे. महापौर सीमा भोळे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी पहिली महासभा दुपारी १ वाजता होत आहे. या महासभेत महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन त्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यानतंर दुपारी दुसरी विशेष महासभा होऊन त्यात इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/nFWvxgAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬