[jalgaon] - भादली शिवारात शेतमजुराची आत्महत्या

  |   Jalgaonnews

जळगाव : भादली शिवारात शेतात असलेल्या एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ४) दुपारी २ वाजता उघडकीस आली. गणपत गुतेराम बारेला (वय ३०, मूळ रा. निमड्या, ता. रावेर) असे मृत सालदाराचे नाव आहे. बारेला याचे रविवारी (दि. ३) रात्री एका नातेवाइकाशी वाद झाले होते. हे भांडण मिटवण्यासाठी त्याचे वडील सोमवारी भादली येथे येणार होते. तत्पूर्वीच बारेला यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. बारेला यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे व मुलगी असा परिवार आहे.

रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३) दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या आसोदा सुमारास रेल्वेगेट ते पाचमोरीदरम्यान घडली. ईश्वर त्र्यंबक पाटील (वय ४५, रा. मेस्को माता मंदिर परिसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. ईश्वर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवारी दुपारी तो रेल्वेरुळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेचा धक्का लागला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ व बहिण असा परिवार आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bCciaAAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬