[kolhapur] - आमदार क्षीरसागरांचे परिवर्तन झालेय

  |   Kolhapurnews

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमदार राजेश क्षीरसागर माझ्यासोबत गाडीतून आले. त्यावेळी चर्चा करताना त्यांच्यात परिवर्तन झाल्याचे दिसले. यापुढे दादा, टीम म्हणून काम करूया,' अशी टिप्पणी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरण इमारतीच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार क्षीरसागर यांच्यातील कटुता दूर करण्याचा प्रयत्न केला. युती झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांतील भाषणांतील फरक स्पष्टपणे समोर आला.

पालकमंत्री पाटील यांच्यावर आमदार क्षीरसागर यापूर्वी अनेकवेळा चौफेर टीका केली होती. त्याला पालकमंत्र्यांनीही त्या-त्या वेळी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. पण युती जाहीर होताच दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळण्यास सुरूवात केली. जाहीर कार्यक्रमातून दिसत असलेला हा बदल आणि गाडीत झालेली चर्चा या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपल्या भाषणात चांगलीच टोलेबाजी केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/grciugAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬