[kolhapur] - गिरगावने दिले २८० जवान

  |   Kolhapurnews

कोल्हापूर: चार हजार लोकसंखेच्या गिरगावने पहिल्या महायुद्धापासून सैनिकी परंपरा जोपासली आहे. कोल्हापूरपासून दहा किलोमीटर अंतरावरील या गावाने आजवर तब्बल २८० जवान देशाच्या सेवेसाठी घडवले. सध्या ६५ तरुण सैन्यदलात विविध पदांवर सेवा बजावत आहेत. या गावातील सुभाष पाटील यांच्या कुटुंबातील चौघे सख्खे भाऊ सैन्यात होते, तर त्यांची पुढची पिढीही सैन्यात सेवा बजावत आहे. देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या या गावाने अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

सोशल मीडियात शत्रूविरोधात युद्धगर्जना करणारे कमी नाहीत. पुलवामा येथे सैन्याच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियात युद्धज्वर शिगेला पोहोचला आहे. मात्र, ज्या गावात जवळपास प्रत्येक घरात आजी-माजी सैनिक आहे, अशा गिरगावमध्ये काय वातावरण असेल? याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. १८५७ च्या लढ्यात ब्रिटिशांविरोधात लढताना शहीद झालेले फिरंगोजी शिंदे यांचा वारसा या गावाला लाभला आहे. दुसऱ्या महायुद्धात या गावातील चार जवानांचा सहभाग होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतर जणू काही या गावातील तरुणांमध्ये सैन्यात भरती होण्याची चढाओढच सुरू झाली. तीन पिढ्या सैनिकी परंपरा जपणारी अनेक कुटुंबे या गावात आहेत....

फोटो - http://v.duta.us/hYI5lwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/oPCLVwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬