[kolhapur] - राशिवडेत काविळीची साथ

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राशिवडे (ता. राधानगरी) गावात कावीळीची साथ पसरली आहे. गावात कावीळीचे नऊ रुग्ण आढळले असून अनेकांना लक्षणे दिसू लागली आहेत. आरोग्य विभागाने गावातील लोकांना मार्गदर्शन आणि उपचार करावेत अशी मागणी ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे.

राशिवडे गाव हे बाजारपेठेचे गाव. गावची लोकसंख्या सुमारे पंधरा हजार आहे. गावात गेले चार दिवस काही लोकांना उलट्या, ताप, मळमळणे अशी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर काविळीची लागण झाल्याचे दिसून आले. गावात काविळ झालेले नऊ रुग्ण आढळून आले असून अनेक लोकांना लक्षणे दिसत आहेत. याबाबत प्राथमिक आरोग्यात संपर्क साधला असता पाण्यामुळे काहीजणांना कावीळ झाली असून नागरिकांनी अशी लक्षणे जाणवताच त्वरित उपचार घेण्यासाठी यावे. लवकरच गावचा सर्व्हे केला जाईल. पाणी उकळून प्यावे, घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/ohf4ggAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬