[kolhapur] - साधना, शिवराज, शिवाजी विद्यालय विजेते

  |   Kolhapurnews

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशन आणि टॅलेंट कन्सोल ग्लोबल फाउंडेशनमार्फत झालेल्या बेबी लीग फुटबॉल स्पर्धेत बारा वर्षे गटात साधना हायस्कूल, दहा वर्षे गटात शिवाजी विद्यालय तर आठ वर्षे गटात शिवराज स्कूलने विजेतेपद पटकावले. तर निपाणी फुटबॉल अकॅडमी, न्यू होरायझन गडहिंग्लज व सर्वोदय गडहिंग्लज या शाळांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

एमआर हायस्कूलच्या मैदानावर गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत तीन गटात ३४ संघांनी भाग घेतला होता. निपाणीचा जीत फुटाणकर, शिवाजी विद्यालयाचा आदित्य मांडे आणि सर्वोदयचा रोमन शहा यांचा हिरो ऑफ द टुर्नामेंटमधून गौरव करण्यात आला. टीसीजी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद इंचानाळकर, युनायटेडचे उपाध्यक्ष अरविंद बारदेस्कर, सुरेश कोळकी, संजय पाटील, राजू भोपळे, गंगाराम नाईक, जिनगोंडा पाटील, प्रसाद गवळी, मनीष कोले यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. स्पर्धा संयोजक दीपक पवार यांनी प्रास्ताविक केले. युपिंदर पवार यांनी आभार मानले. दीपक कुपान्नावर, ओंकार घुगरी, ओंकार सुतार आदींनी विशेष परिश्रम घेऊन स्पर्धा यशस्वी केल्या....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KKReUwAA

📲 Get Kolhapur News on Whatsapp 💬