[mumbai] - चिपी विमानतळाचे आज उद्घाटन

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

कोकणला हवाईमार्गे जोडण्यासाठी 'उडान' अंतर्गत विमानसेवा देणाऱ्या कंपनीची घोषणा २५ फेब्रुवारीला होणे अपेक्षित होते. मात्र २५ तारखेची ही निविदाही अद्याप घोषित झालेली नाही. तरीही सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाठी केंद्र व राज्य सरकारने घाई केली आहे. या विमानतळाचे आज, मंगळवारी उद्घाटन होणार आहे.

'चिपी आणि रत्नागिरी हे दोन्ही विमानतळ नीम दुर्गम श्रेणीतील आहेत. त्यामुळेच या विमानतळांवरून सेवा देण्यासाठी कंपन्या फार उत्सुक दिसत नाहीत. या विमानतळांवरून प्रवासी मिळतील की नाही, याची कंपन्यांना धास्ती वाटत आहे. त्यामुळेच अद्याप कंपन्यांची घोषणा होऊ शकलेली नाही', असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘उडान ३.१’मध्ये १२ विमानसेवा

सेवा पुरवठादार अद्याप निश्चित नसलेल्या 'उडान ३.१'मध्ये कोकणातील दोन विमानतळांसह राज्यासाठी एकूण १२ विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई, मुंबई-रत्नागिरी-मुंबई, मुंबई-नाशिक-मुंबई, पुणे-सिंधुदुर्ग-पुणे व नाशिक-पुणे-नाशिक अशा स्वरुपातील सेवांचा समावेश आहे. आता नेमकी कोणती कंपनी या सेवांसाठी पुढे येणार यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे....

फोटो - http://v.duta.us/YFLvTQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/QgCU1gEA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬