[mumbai] - पालिका रुग्णालयांमध्ये मांजरींचाही उपद्रव

  |   Mumbainews

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबईच्या पालिका रुग्णालयांमध्ये मुक्तपणे विहार करणाऱ्या कुत्र्यांबरोबरच मांजरींचाही उपद्रव वाढला असून, त्यामुळे रुग्णांसह रुग्णालयातील कर्मचारी वर्गही हैराण झाला आहे. मांजरींची संख्या नियंत्रणात राहावी यासाठी त्यांची नसबंदी करण्याबरोबरच त्यांना इतरत्र सोडून देण्याचा विचारही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असतानाच पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना मांजरींचाही उपद्रव सहन करावा लागतो, अशी तक्रार रुग्णसेवा संस्थेचे समन्वयक विनोद माने यांनी केली. पालिकेच्या केईएम, नायर व लो. टिळक रुग्णालयाच्या जुन्या इमारतींच्या कोणत्याही बाजू बंदिस्त नसल्यामुळे तेथे कुत्रे-मांजरींना मुक्त प्रवेश मिळतो. त्या कोणत्याही बाजूने रुग्णालयात येतात. आवारात पिल्लांना जन्म देतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढतच चालली आहे....

फोटो - http://v.duta.us/BAFKmAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/bA5WnQAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬