[mumbai] - पोलिसांच्या गाड्यांना ब्रेक

  |   Mumbainews

मुंबई

मुंबईतील पोलिसांची गस्त अधिक प्रभावी व्हावी, घटनास्थळी पोलिसांना अल्पावधीत पोहोचता यावे यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलिस ठाण्यांना प्रत्येकी सात वाहने देण्यात आली. मात्र पोलिस दलात चालकांची संख्या फारच अपुरी असल्याने ही वाहने धूळ खात पडून आहेत. १२ वर्षांपासून पोलिस दलामध्ये चालकांची भरतीच न झाल्याने आपत्कालीन स्थितीत सेवा कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे चालक नसलेल्या पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना वाहने चालवावी लागत असल्याने मुंबई पोलिस दलामध्ये प्रचंड असंतोष आहे.

पोलिस दलाचा चालक हा कणा मानला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून हा कणा दिवसेंदिवस कमजोर होत आहे. मोटार परिवहन विभागामार्फत पोलिस ठाणी, गुन्हे शाखा, विशेष शाखा, सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्त, सहपोलिस आयुक्त, आयुक्त या सर्वांच्या वाहनांना चालक पुरविले जातात. तसेच व्हीआयपी, व्हीव्हीआयपींसाठी काही चालक राखीव ठेवले जातात. मोटार परिवहन विभागात चालकांची मंजूर पदे २८०० इतकी असून सध्या प्रत्यक्षात केवळ १५०० चालक आहेत आणि मुंबई पोलिस दलातील वाहनांची संख्या पाच हजारांच्यावर आहे. सन २००७मध्ये चालकांची भरती करण्यात आली होती . दरवर्षी निवृत्त होणाऱ्या चालकांची संख्या वाढत असल्याने आणि भरती रखडल्याने तफावत दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईमध्ये ९४ पोलिस ठाणी असून प्रत्येक पोलिस ठाण्यास सात वाहने देण्यात आली आहेत. या सात वाहनांसाठी प्रत्येकी एक असे ६५० चालक मोटार परिवहन विभागामार्फत देण्यात आले आहेत. मात्र मुंबई पोलिस दलात आठ तास ड्युटी असल्याने एकाच ड्युटीमध्ये वाहन चालविले जाते. उर्वरित १६ तास वाहन चालविण्यासाठी चालकच उपलब्ध नसल्याने ही वाहने पडून असतात. चालकांना अधिक वेळ वाहने चालविण्यास सांगितले तर ते आठ तास ड्युटीकडे बोट दाखवतात. त्यामुळे गरज पडल्यास पोलिस ठाण्यातील उपस्थित कॉन्स्टेबलपासून ते पोलिस निरीक्षकापर्यंतच्या अधिकाऱ्यांना मनात नसतानाही वाहनाचे सारथ्य हाती घ्यावे लागते....

फोटो - http://v.duta.us/WW1BgQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/2JlTugAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬