[mumbai] - Raj Thackeray: मुंबई: राज ठाकरे करणार 'राजकीय सर्जिकल स्ट्राइक'

  |   Mumbainews

मुंबई:

भारतीय हवाई दलानं पाकिस्तानस्थित 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर एअर स्ट्राइक केल्यानंतर देशात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेही मुंबईत 'राजकीय सर्जिकल स्ट्राइक' करण्याच्या तयारीत आहेत. येत्या शनिवारी त्यांची मुंबईत सभा होत असून, ते कुणावर शाब्दिक हल्ला चढवतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या सोशल मीडियावर 'राज'कीय सर्जिकल स्ट्राइक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा,' अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल झाले आहेत. त्यावर येत्या शनिवारी, ९ मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सभा होणार आहे, असा उल्लेख आहे. या पोस्टर्सची सध्या चर्चा सुरू असून, राज कुणावर राजकीय सर्जिकल स्ट्राइक करणार याबाबत उत्सुकता आहे....

फोटो - http://v.duta.us/jfx1tQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/P3nFegAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬