[nagpur] - ताडोबात पुन्हा काळ्या बिबट्याचे दर्शन

  |   Nagpurnews

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

जैविक विविधता, नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या पर्यटकांसाठी नवे आकर्षण ठरला आहे.

राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला महत्वाचे स्थान आहे. ताडोब्यात पर्यटनासाठी आलेल्या एका बेल्जीयम जोडप्याला मे २०१८मध्ये काळा बिबट्या (ब्लॅक पॅन्थर) पहिल्यांदा आढळला होता. जंगल सफारी करताना कोळसा वनपरिक्षेत्रात शिवाझरी या भागात हा दिसला होता. अशाच प्रकारचा बिबट्या २०१४ मध्ये कोळसा व मोहर्लीच्या सीमेवरील बोटेझरी भागात ‘कॅमेरा ट्रॅपिंग’मध्ये आला होता. त्यामुळेच या भागात काळा बिबट्याचे दर्शन झाल्याने ही बाब महत्वपूर्णच मानली जात होती. ताडोब्यात पुन्हा एकदा या काळ्या बिबट्याचे दर्शन रविवारी जागतिक वन्यजीवदिनी पर्यटकांना झाले. डौलदार चालीच्या काळ्या बिबट्याच्या दर्शनाने पर्यटक सुखावले असून त्यासंबंधीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे....

फोटो - http://v.duta.us/g1pUcAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/BHYfywAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬