[nashik] - निमाचा राज्यस्तरीयक्रीडा महोत्सव

  |   Nashiknews

निमाचा राज्यस्तरीय

क्रीडा महोत्सव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन (निमा) या संघटनेच्यावतीने गोल्फ क्लब मैदानावर ८ ते १० मार्च कालावधीत जिल्हा अंतर्गत आणि राज्यस्तरीय क्रिकेट क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सन्मानित करण्यात येणार आहे. वैद्यकिय व्यवसायिकाच्या आरोग्यदायी स्वाथ्यच्या विचार करून जिल्ह्य अंतर्गत क्रिकेट स्पर्धा 'निमा करंडक' या नावाने आयोजन गेल्या सहा वर्षांपासून नाशिक निमा शाखा राबवित आहे. यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील डॉक्टरांचे संघ नाशिक शहरात दाखल होणार आहेत.

या क्रिकेट महोत्सवाप्रसंगी पहिल्या दिवशी ८ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील तालुकास्तरीय डॉक्टरांच्या स्पर्धा होणार आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, निमाचे राष्ट्रीय शाखेचे सहखजिनदार शैलेश निकम, निमा राज्य शाखेचे खजिनदार डॉ. भूषण वाणी, उपसचिव डॉ. अनिल निकम तसेच प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्‍त्या व नाशिक महापालिकेच्या प्रभाग पश्‍चिम समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील निमा नाशिक, सातपूर, पाथर्डी, पंचवटी, दिंडोरी, पेठ, आयएमए, शिवगर्जना लासलगाव हे संघ सहभागी होणार आहेत....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/TNwa1QAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬