[navi-mumbai] - ज्वेलरी पार्कचे आज भूमिपूजनमहापे मध्ये उभे राहणार देशातील भव्य ज्वेलरी

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबईतील महापेमध्ये ज्वेलरी पार्क उभारण्याच्या कामाला आज, मंगळवारी सुरुवात होणार आहे. या पार्कचे भूमिपूजन केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दुपारी होणार आहे. या पार्कसाठी ३० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. मुंबईत असलेला ज्वेलरी उद्योग या ठिकाणी स्थलांतरित होणार आहेय.

ज्वेलरी उद्योगात देशात मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होत असल्याने त्याच्या देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार आहे. मुंबईतील झवेरी बाजार तर सोन्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. सोन्या-चांदीचा, हिऱ्याचा व्यापार करणारे अनेक घाऊक व्यापारी येथे आहेत. दागिने घडविणारे अनेक सोनार येथे वर्षानुवर्षांपासून आहेत. सोने वितळविण्यापासून ते त्यापासून दागिने घडवण्याची कामे येथे केली जातात. त्यासाठी अनेक कारागीर येथे राबतात. मात्र सध्या मुंबईच्या वाढत्या लोकवस्तीमुळे हा सोनेरी उद्योग मुंबईबाहेर हलविण्याची मागणी काही वर्षांपासून होत आहे. येथे वर्षानुवर्षांपासून असलेल्या सोने व्यापाऱ्यांना ही जागा आता अपुरी पडत आहे. त्यामुळे तेही चांगला पर्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. त्यानुसार, हा उद्योग स्थलांतरित करण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू होते. त्यानुसार आता महापे येथील ३० एकर जागा ज्वेलरी पार्कसाठी निश्चित करण्यात आली आहे. या जागेवर दागिने घडविणारे कारखाने उभारले जाणार आहेत. सोन्याच्या दागिन्यांची घाऊक खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना येथे आपला व्यवसाय वाढविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सोने व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/0GuQDgAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬