[navi-mumbai] - दीड वर्षीय मुलीसोबत लैंगिक चाळे

  |   Navi-Mumbainews

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

कोपरी गाव सेक्टर २६ भागातील झोपडपट्टीत रहाणाऱ्या एका ५० वर्षीय नराधमाने शेजारी रहाणाऱ्या महिलेच्या दीड वर्षीय चिमुकलीला खेळवण्याच्या बहाण्याने घरामध्ये आणून चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अफसर चाँद मोहमद खान असे या नराधमाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी अफसर खान व यातील पीडित दीड वर्षीय चिमुकली वाशीलगतच्या कोपरी गाव येथील झोपडपट्टीत रहाते. शनिवारी दुपारी आरोपी अफसर खान याने पीडित मुलीला तिच्या आईकडून खेळविण्याच्या बहाण्याने स्वत:कडे घेतले. त्यानंतर त्याने त्या मुलीला दुसऱ्या व्यक्तीच्या झोपडीमध्ये नेऊन तिच्यासोबत अश्लिी व लैंगिक चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी पीडित मुलीची आई तिथे आल्याने तिने आरडा-ओरडा करून अफसर खान याच्या तावडीतून मुलीला घेतले. त्यानंतर त्याच्या विरोधात एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अफसर खानवर विनयभंग आणि पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला सात मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/_dX51gAA

📲 Get Navi-mumbai News on Whatsapp 💬