[pune] - काँग्रेसचे राजकारणसॉफ्ट हिंदुत्वाचे

  |   Punenews

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'काँग्रेसकडे अनेक घटनातज्ज्ञ, वकील असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राज्यघटनेच्या चौकटीत आणण्याच्या मसुद्याचे काम माझ्यावर कसे सोपवले जाते', असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही आंबेडकरांनी केला.

संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याऱ्यांसोबतच निवडणूकपूर्व आणि निवडणुकीनंतर युती हा वंचित बहुजन आघाडीचा धोरणात्मक निर्णय आहे. मात्र, ही मागणी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाला मान्य आहे का, असा खडा सवालही आंबेडकरांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २८ फेब्रुवारीला आंबेडकरांना लेखी पत्र पाठवून महाआघाडीत सामील होण्यासंदर्भात आणि संघाला घटनेच्या चौकटीत आणण्याचा मसुदा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर आंबेडकरांनी सोमवारी विखे पाटील यांना चार पानी पत्र लिहून वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हा संघाचा अजेंडा आहे. त्यामुळे मनुवादाचा पुरस्कार करणाऱ्या संघटनांना संविधानाच्या चौकटीत आणून धर्मनिरपेक्षता कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठीच काँग्रेसकडे मसुदा मागितला. मात्र, काँग्रेस याबाबत गंभीर नसून आपल्या कृतीतून सॉफ्ट हिंदुत्ववादाचा संदेश देत असल्याची नाराजीही आंबेडकरांनी व्यक्त केली....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/htJ_3wAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬