[pune] - फरारी आरोपीपोलिसांच्या जाळ्यात

  |   Punenews

म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या पाच वर्षांपासून फरारी असणाऱ्या सराईत आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. गणेश सूर्यभान सातपुते (वय ३७, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर अपहरण व खंडणीचा गुन्हा आहे.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सातपुतेवर २०१४ मध्ये गुन्हा दाखल आहे. तेव्हापासून तो पोलिासांना गुंगारा देत होता. सहायक निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी व त्यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी सातपुते बालाजीनगर भागात येणार असल्याची माहिती कर्मचारी गणेश चिंचकर आणि अभिजित जाधव यांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक विष्णू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चिवडशेट्टी, कर्मचारी कुंदन शिंदे, कृष्णा ढगे व पथकाने या ठिकाणी सापळा रचून त्याला पकडले. सातपुतेकडे चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/jLalxgAA

📲 Get Pune News on Whatsapp 💬