[thane] - डेब्रिज डंम्पिंगप्रकरणी पालिकेचे कागदी घोडे!

  |   Thanenews

घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २० हजारांच्या दंडाची नोटीस

४८ तासांमध्ये कारणे दाखवा; गुन्हे दाखल करण्याचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

ठाण्यातील कासारवडवली भागातील पाणथळक्षेत्रावर डेब्रिज डंम्पिंगप्रकरणी सातत्याने तक्रार आणि कायदेशीर लढाईचा मार्ग पर्यावरण कार्यकर्त्यांनी सुरू केल्यानंतर महापालिकेकडून कारवाईच्या नोटिसांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु शेकडो हेक्टर पाणथळक्षेत्र डेब्रिज डंम्पिंगमुळे उद्ध्वस्त होत असताना याप्रकरणी अवघ्या २० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस धाडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ही कारवाई म्हणजे केवळ महापालिकेचे कागदी घोडे ठरले आहे. शहरामध्ये बांधकाम निष्कासन व्यवस्थापन अधिनियमानुसार डेब्रिज डंम्पिंग उघड्यावर टाकण्यास बंदी आहे. तर दुसरीकडे पाणथळभूमी ऱ्हासाप्रकरणी ही न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. परंतु महापालिकेकडून केवळ कारवाईचा देखावा सुरू आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन मंत्रालयाने २९ मार्च २०१६ रोजी पर्यावरण संरक्षण अधिनयम प्रसिद्ध केला असून त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातही तो लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार महापालिका क्षेत्रात इमारतींचा बांधकाम कचरा टाकण्यास बंदी आहे. तर वने, कांदळवने, नदीक्षेत्र आणि पाणथळ ठिकाणी डंम्पिंग झाल्यासही कारवाईचे स्पष्ट आदेश आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातील ओवळे तलाठी कार्यालयाच्या हद्दीतील मौजे वडवली येथील पाणथळीवर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य, मलबा, रबड, माती यांचा भरणा करण्यात येत आहे. या प्रकरणी पर्यावरण कार्यकर्त्या रोहित जोशी यांनी जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पाणथळ समितीकडेही तक्रार केली. परंतु त्यांच्याकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे अखरे त्यांनी या यंत्रणांना कायदेशीर नोटीस पाठवल्या आहेत. महापालिकेने या प्रकरणी डेब्रिज डम्पिंगच्या दृष्टीने कारवाई करण्याची गरज असताना कायदेशीर लढा सुरू झाल्यानंतर अखेर या भागातील जमीन मालकांना नोटीसा बजावण्याची प्रक्रिया करण्यात आले आहे. पाणथळ क्षेत्रात डेब्रिज डंम्पिंग होत असून कायद्याचे उल्लंघन होत असल्याने ४८ तासांत कारणे दाखवा अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेकडून करण्यात आला आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/kWeXpwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬