[akola] - स्कूल बस उलटली: आठ विद्यार्थी जखमी

  |   Akolanews

विझोरा: कातखेड- येवता रोडवर भरधाव टिप्पर ट्रकने समोरून येणाऱ्या मिनी स्कूलबसला धडक दिली. यात स्कूलबस रस्त्याच्याखाली उतरून पलटी झाली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या अपघात स्कूलबसमधील दोन विद्यार्थी गंभीर जखमी तर सहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

मलकापूर येथील बालाजी कॉन्व्हेटची एमएच २७-एक्स-९५२७ क्रमाकांची मिनी स्कूल बस कानशिवणी येथून विद्यार्थ्यांना घेऊन मलकापूरकडे जात असताना, येवताकडून विरूद्ध दिशेने येणाऱ्या एमएच ३0-एल-२१७४ क्रमांकाच्या भरधाव टिप्परने स्कूल बसला धडक दिली. यामुळे मिनी बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने, मिनी स्कूल बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. या अपघातात स्कूल बसमधील जान्हवी संघपाल काजळे(१३ रा. विझोरा खदान), खुशी शिर्के(७ रा. येळवण) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले तर तुषार बहारे, कल्याणी बहारे, प्रीती कुºहाडे, शुभम कुºहाडे, सुरज शिंदे हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. धडक देणारा टिप्पर हा ओबेरॉय कंट्रक्शनचा असल्याचे, अपघात घडल्यानंतर चालकाने टिप्पर जागेवरच सोडून पळ काढला. जखमी विद्यार्थ्यांवर दवाखान्यात उपचार करून त्यांना घरी पोहोचविण्यात आले. या प्रकरणात बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात टिप्पर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (वार्ताहर)

फोटो - http://v.duta.us/Zvi9DQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/O6FJKQAA

📲 Get Akolanews on Whatsapp 💬