[chandrapur] - काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या घरावर आयकर विभागाची धाड

  |   Chandrapurnews

पैसे वाटत असल्याच्या माहितीवरून कारवाईसाठी गेलो: देशपांडे

चंद्रपूर, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आणि प्रचारतोफा संपताच आज बुधवारी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या निर्माणाधीन घरावर सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच आयकर विभागाच्या चमुने संयुक्तरित्या धाड टाकली. येथील सिव्हील लाईन परिसरातील लोकमान्य टिळक विद्यालय परिसरात काही लोकं पैसे वाटत असल्याची माहिती पोलिस विभागाच्या गुन्हे शाखेतून पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे या परिसरात कारवाईसाठी भरारी पथक रवाना झाले. एका नवनिर्माणधीन घराची तपासणी केली गेली. शिवाय हा संपूर्ण परिसर पिंजून काढला. पण, कुठेच कुणीही पैसे वाटताना कुणी सापडले नाहीत. शिवाय ज्या घराची तपासणी केली. तिथेही पैसे आढळले नाही. हे घर नेमके कुणाचे होते, याबाबत आम्हाला कल्पना नाही. माहितीच्या आधारे आम्ही कारवाईसाठी रवाना झालो. यावेळी आयकर विभागाचेही अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या पथकातील देशपांडे यांनी ही माहिती तरुण भारतला दिली. तर पथकाचे प्रमुख मनोहर गव्हाड यांनी, धाड किंवा छापा टाकण्याचे अधिकार आयकर विभागाला आहे. आम्ही त्यांच्यासोबत कारवाईसाठी गेलो होतो. निवडणूक संदर्भात पैसा असल्यास आयकर विभागाच्या अहवालावर आम्ही कारवाई करीत असल्याची माहिती दिली. यासंदर्भात आयकर विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होवू शकला नाही. Web Title: Income Tax Department's Raid's on Congress candidate Balu Dhanorkar's house

फोटो - http://v.duta.us/kGGaggAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/n9jSHAAA

📲 Get Chandrapurnews on Whatsapp 💬