[goa] - खाण अवलंबितांचे दिल्लीत धरणे

  |   Goanews

पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील खाणी बंद झाल्याने तीन लाखांहून अधिक लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे खाण व्यवसाय त्वरित सुरू करावा, अशी मागणी घेऊन गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटच्या बॅनरखाली दिल्‍लीत जंतर-मंतरवर सुमारे 400 खाण अवलंबितांनी मंगळवारपासून तीन दिवसीय धरणे आंदोलनाला सुरुवात केली. केंद्र सरकार तसेच

सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात असल्याचे फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी सांगितले.

गावकर म्हणाले की, गोव्यातील खाण व्यवसाय मागील 13 महिन्यांपासून बंद आहे. खाणी पुन्हा सुरू करा, अशी मागणी राज्य सरकारकडे सातत्याने करीत आहोत. मात्र, मागणी अजूनही पूर्ण करण्यात आलेली नाही. राज्यातील खाणी बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2018 मध्ये दिला होता. त्यामुळे या व्यवसायावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे अवलंबून असलेल्या तीन लाख लोकांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/Mine-protest-movement-in-Delhi/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/Mine-protest-movement-in-Delhi/

📲 Get goanews on Whatsapp 💬