[maharashtra] - शरद पवारांच्या सभेला अल्प प्रतिसाद, रिकाम्या खुर्च्याच जास्त

  |   Maharashtranews

ठाणे : उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या सभेत गर्दीपेक्षा रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत होत्या. ही सभा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली होती. मात्र उल्हासनगर येथे झालेल्या सभेला नागरिकांनी अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या सभेची चर्चा जास्त रंगत आहे. याआधी पुण्यातही अशीच परिस्थिती भाजपच्या सभेत झाली होती. त्यावेळी सभाच गुंडाळावी लागली होती. मात्र, ही जागा भाजपने जिंकली होती. आता राष्ट्रवादीच्या सभेला अल्प प्रतिसाद मिळाला तरी पवार यांनी आपले भाषण करत मोदी सरकावर जोरदार प्रहार केला. त्यावेळी अनेकजण भर सभेतून उठून जात होते. ही सभा कल्याण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केली होती.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी उल्हासनगरच्या गोल मैदानात शरद पवार यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेला पोहोचण्यासाठी शरद पवार यांना उशीर झाला होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास पवारांचे भाषण सुरू झाले तेव्हा सभेत रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत होत्या. नागरिकांच्या अल्प प्रतिसादामुळे कल्याण मतदार संघातील आघाडीच्या पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडाल्याचं दिसत होते.

फोटो - http://v.duta.us/8vhgJAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/DbioxAAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬