[mumbai] - मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६

  |   Mumbainews

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला महाराष्ट्रात विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून, त्यादिवशी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत राहील. तथापि, नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रावर सकाळी ७ ते दुपारी ३पर्यंत मतदान होईल, असे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातर्फे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले.

विदर्भात प्रचंड असल्यामुळे लोकसभेच्या मतदानासाठी दीड तासांची वेळ वाढवण्यात आल्याच्या वृत्तास निवडणूक आयोगाने दुजोरा दिला नाही. मुळात लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर १० मार्चच्या अधिसूचनेत मतदानाच्या दिवशी मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी राहील, असे नमूद केले आहे. त्यामुळे याबाबत आयोगाने नवीन काहीही निर्णय घेतलेला नाही, असे निवडणूक अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानाच्या वेळेत वाढ करण्यात आल्याचे गेल्याच महिन्यात आयोगाने स्पष्ट केले होते.

फोटो - http://v.duta.us/0w24JQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/KRgCPwAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬