[sangli] - मूर्तीवरील दागिने लंपास

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

वाजेगाव (ता. मिरज) येथील वाजुबाई देवीचे मंदीर फोडून चोरट्यांनी 3 किलो 160 ग्रॅमच्या चांदीच्या दागिन्यांसह पंचधातू, पितळी मूर्ती असा दीड लाखांचा ऐवज लंपास केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष दिनकर पाटणकर (वय 64, रा. गावभाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पुजारी मंदीर बंद करून सांगलीत घरी परतले होते. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पुजेसाठी ते मंदिरात गेल्यानंतर चोरीची ही घटना उघडकीस आली. त्यांनी याची माहिती पाटणकर यांना दिली. चोरट्यांनी मंदिराचा दरवाजाचा कडी-कोयंडी उचकटून आत प्रवेश केल्याचे दिसून आले.

चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा, चांदीचा पोहेहार, खडा मुखवटा, केदारलिंग देवाचा चांदीचा मुखवटा, चांदीचे दीड किलो वजनाचे दागिने, चांदीची 430 नाणी, चांदीचे वाघनख्याचे लॉकेट,चांदीची समई, सव्वा किलो वजनाची पंचधातूची दीपलक्ष्मीची मूर्ती, पितळी नंदी, पितळी पिंड असा दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याचे निदर्शनास आले....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Jewelery-stolen-from-the-statue/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Jewelery-stolen-from-the-statue/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬