[sangli] - विशाल पाटील यांना सांगलीतून मताधिक्य देऊ

  |   Sanglinews

सांगली : प्रतिनिधी

स्वाभिमानी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विशाल पाटील यांना सांगली विधानसभा मतदारसंघात मताधिक्य देऊ, अशी ग्वाही काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीतील प्रभाग बारामध्ये पदयात्रा काढण्यात आली. गणपती पेठ, कापडपेठ, गवळी गल्ली, बुरूड गल्ली, गुजर बोळ, पटेल चैक, जामवाडी, वखारभाग या परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली.

पाटील म्हणाले, भाजप सरकार केवळ जुमलेबाज आहे. फक्त थापा मारायच्या व जनतेला भुलवायचे काम भाजपकडून केले जात आहे. 15 लाख रुपये देण्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले होते, आता तो केवळ जुमला असल्याचे सांगत आहेत. 2 कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासनही हवेत विरले आहे. नोटाबंदीमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. विदशातील काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा पोकळ ठरली आहेत. विदेशातील काहीही पैसे भारतात आलेले नाहीत. अशा थापाड्या सरकारला जनता धडा शिकवेल....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/will-give-more-votes-to-Vishal-Patil-from-Sangli-said-pruthviraj-patil/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/will-give-more-votes-to-Vishal-Patil-from-Sangli-said-pruthviraj-patil/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬