[sangli] - ‘सांगली’त विकासाचा अजेंडाच गायब

  |   Sanglinews

सांगली : अमृत चौगुले

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रंगलेल्या सांगलीच्या प्रचार आखाड्यात विकासाचा अजेंडा आणि मुद्दाच गायब झाला आहे. निवडणुकीत महायुती, महाआघाडी, बहुजन वंचित आघाडीसह सर्वच उमेदवारांनी प्रचारात एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे. ते करताना गुंडगिरी, दमबाजी मोडून काढू अशीच भाषा ऐकू येत आहे.विकासाच्या निव्वळ नावावर मतदानासाठी साद घालणे सुरू ठेवले आहे. मात्र शहर, जिल्ह्याच्या विकासाचा कोणताच प्लॅन, त्यादृष्टीने काय करणार, याबाबत कोणीच बोलायला तयार नाही.

सांगली लोकसभा मतदारसंघात अर्ज माघारीनंतर आता महायुतीचे खासदार संजय पाटील, महाआघाडी-स्वाभिमानीचे विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांच्यासह तब्बल 12 जण मैदानात उतरले आहेत. त्यानुसार आता प्रचाराचा धडाकाही सुरू झाला आहे.

प्रचारादरम्यान इच्छुक पक्ष व उमेदवारांकडून शहर, जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा तयार करावा लागतो. एवढेच नव्हे तर त्या आराखड्याची पुढे निवडून येणार्‍याने त्यासाठी केंद्र, राज्य शासनाकडे पाठपुरावा करून अंमलबजावणी करावयाची असते. दुर्दैवाने आजअखेर त्यादृष्टीने तसा पद्धतशीर अजेंडा जनतेसमोर आजपर्यंत आलेलाच नाही. किमान आता निवडणूक पद्धतीतील बदलानुसार तसा अजेंडा तयार करून जनतेसमोर जाणे गरजेचे होते....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/development-agenda-missing-in-lok-sabha-election-in-sangli/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/development-agenda-missing-in-lok-sabha-election-in-sangli/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬