[satara] - उन्हाळी वाळवणासाठी महिलांची धांदल

  |   Sataranews

सातारा : मनिा शिंदे

आधुनिक काळातही कुरडया, सांडगे, पापड, शाबूच्या फेन्या, बटाटा वेफर्स परंपरागत उन्हाळी वाळवणांची गोडी आजही कायम आहे. चैत्राच्या कडक उन्हात या उन्हाळी कामांना वेग येत असून ग्रामीण भागात सध्या महिला वर्गाची धांदल उडाली आहे. रेडीमेडच्या युगातही घरच्या पदार्थांना अस्सल चव असल्याने हेच पदार्थ बचत गटातील अनेक महिलांच्या व्यवसायाचा कणा बनले आहेत.

आजही ग्रामीण भागात वर्षभर पुरेल एवढं धान्य, तिखट, कडधान्यं साठवण्याची पध्दत आहे. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाकडे वर्षाची बेगमी भरलीच जाते. कुठल्याही किड प्रतिबंधक औषधाविना धान्य साठवण्याची ही कला परंपरागत आलेली आहे. सर्व धान्य वर्षभर निरोगी रहावे यासाठी ते चैत्राच्या तापीमध्ये कडक वाळवले जाते. त्यासाठी प्रत्येकाच्या अंगणात ही धान्याची वाळवणं सुरु असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. या वाळवणाबरोबरच महिला वर्गातही उन्हाळी कामांना चांगलाच वेग आला आहे....

फोटो - http://www.pudhari.news/news/Satara/Runway-for-women-in-summer/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Satara/Runway-for-women-in-summer/

📲 Get Satara News on Whatsapp 💬