[thane] - आंब्याची दर्जा खालावला, निर्यात थंडावली!

  |   Thanenews

म. टा. वृत्तसेवा,

आंब्याचा हंगाम हा बाजारातील सर्वात मोठा हंगाम मानला जातो. आंब्याची उलाढाल ही कोट्यवधींच्या घरात होते. त्यामुळे सर्वच व्यापारी या हंगामाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र यावर्षी आंब्याचे उत्पादन सरासरी ४० टक्क्यांनी घटले असून बाजारात येणाऱ्या आंब्याचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे आंब्याची मागणी व्यापाऱ्यांना पूर्ण करता येत नाही. वातावरणातील उष्मा वाढला असला तरी आंब्याची निर्यात मात्र थंडावली आहे.

एप्रिलचा दुसरा आठवडा सुरू झाला असून सध्या बाजारात हापूस आंब्याच्या केवळ ४० ते ४५ हजार पेट्या येत आहेत. दरवर्षी या काळात आंब्याच्या ६० ते ७० हजार पेट्यांची आवक होत असते. यातून स्थानिक बाजार पेठेत असलेली आंब्याची मागणी पूर्ण करून युरोपीय, आखाती देशात आपल्याला आंब्याची निर्यात सहजपणे करता येते. एप्रिलमध्ये आंब्याची आवक चांगली होत असल्याने या काळात निर्यातही चांगली होते. त्यामुळे निर्यातदार आंबा निर्यातीच्या तयारीतच होते. मात्र यावेळी हे गणित चुकले आहे....

फोटो - http://v.duta.us/JYcm2QAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/4bVJTAAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬