[thane] - पालखी व यात्रा सोहळ्याचे आयोजन

  |   Thanenews

म.टा. वृत्तसेवा, पालघर

वाडा तालुक्यातील नाणे येथे पुरातन काळापासून असलेल्या महालक्ष्मी व महाकाली मातेची पालखी व यात्रासोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा सलग दोन दिवस चालणार आहे.

महालक्ष्मी व महाकाली मातेची मोठी यात्रा असून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. याअंतर्गत सोमवार, १५ मार्चला सकाळी मंदिरात अभिषेक, होमहवन व गोंधळ होईल व दुसऱ्याच दिवशी म्हणजेच मंगळवार, १६ मार्चला ह. भ. प. संजय महाराज जाधव रा. मनोर यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे व संध्याकाळी पालखी सोहळ्याची मिरवणूक काढली जाईल, असे देवस्थान समिती व ग्रामस्थ मंडळाने म्हटले आहे.

दरम्यान, गुरुवार १८ मार्चला संध्याकाळी ४ वाजता भव्य कुस्तीची दगंल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड येथून पुरुष व महिला कुस्तीपटू खेळण्यासाठी येणार असून, कुस्तीचा थरार अनुभवायला मिळणार आहे, असे बुवा ग्रुप तर्फे कळवले आहे.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/HOLQkwAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬