[chandrapur] - उपचारासाठी ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड

  |   Chandrapurnews

चंद्रपूर: ज्येष्ठ नागरिकांना तातडीने उपचार घेणे सोयीचे व्हावे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. मात्र, या कक्षात सामान्य रुग्णांची रिघ असल्याने ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष घालून ज्येष्ठांना स्वतंत्र कक्षात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

राज्य शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याच सेवे अंतर्गत मोफत आणि तातडीने उपचार मिळावा म्हणून सामान्य रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. मात्र, या कक्षात अन्य रुग्णांची मोठी रीघ असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत राहावे लागते. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या स्वतंत्र कक्षात त्यांनाच उपचार दिला जावा, अशी मागणी केली जात आहे.

फोटो - http://v.duta.us/FCP31AAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/IgcOOgAA

📲 Get Chandrapurnews on Whatsapp 💬