[goa] - धर्मगुरूंचे वादग्रस्‍त भाषण, जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश

  |   Goanews

मडगाव : प्रतिनिधी

राय येथील चर्च मधील धर्मगुरू कॉसेंसाव डिसिल्वा यांनी चर्चच्या प्रार्थना सभे दरम्यान केलेल्या राजकीय आणि द्वेषपूर्ण भाषणामुळे दक्षिण गोव्यात खळबळ माजली आहे. या प्रकाराची दखल घेत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित रॉय (आयएएस) यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रकारणाच्या व्हिडीओ संदर्भात चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

पत्रकारांशी बोलताना सदर व्हिडीओची चौकशी करण्याच्या सूचना दक्षिण गोवा पोलिसांना दिलेल्या आहेत. पोलिसांकडून येणारा चौकशी अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला जाईल, अशी माहिती अजित रॉय यांनी दिली आहे. हा व्हिडीओ कोणाकडून व्हायरल झालेला आहे याची चौकशी केली जात आहे. व्हिडीओ व्हायरल होण्याचा स्त्रोत तपासला जात आहे. तसे आदेश पोलिसांना देण्यात अलेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली....

फोटो - http://www.pudhari.news/news/Goa/priest-controversial-speech-against-investigation-order-to-collector-in-madgav/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Goa/priest-controversial-speech-against-investigation-order-to-collector-in-madgav/

📲 Get goanews on Whatsapp 💬