[maharashtra] - सुरेश धस कुणाला म्हणाले बीडच्या राजकारणातील पोपट?

  |   Maharashtranews

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेश धस यांनी पोपटाची गोष्ट सांगून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. कडा येथील प्रचार सभेत सुरेश धस यांनी राजा आणि त्याचा पोपट यांची गोष्ट त्यांच्या खास शैलीत सांगितली.

राजाचा हा पोपट लोकसभा निवडणूक झाली की, उडून जाईल असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. पोपट मागून आला, पण सुरेश धसची हकालपट्टी केली जयदत्त अण्णाच्या घरात रॉकेलचं... आणि अमरसिंह पंडीत तर विना पाण्याचाच गेला... अशा शब्दांत सुरेश धस यांनी टीका केली.

हा पोपट नुसता गोड गोड बोलणारा पोपट आहे. पोपटाचं नाव पण घेणार नाही, तर कळाला की नाही हा पोपट? असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

फोटो - http://v.duta.us/sUQMbAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/M1vadwAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬