[sangli] - वसंतदादांनी जातीचे राजकारण केले नाही

  |   Sanglinews

आटपाडी : प्रतिनिधी

वसंतरावदादांनी राजकारणात कधी जात-पात पाहिली नाही. अण्णासाहेब लेंगरे, शिवाजीराव शेंडगे यांना आमदार केले, पण काहीजण या निवडणुकीत जातीचे राजकारण करू लागले आहेत. त्यांचा कावा ओळखा, असे प्रतिपादन महाआघाडी स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी केले.

लोकसभा निवडणूक प्रचारार्थ दिघंची येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी प्रचार फेरी काढण्यात आली. त्यानंतर मेळावा झाला. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, अतुल यादव, राहुल वाघमारे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सिद्धेश्वर बाड, रावसाहेब पाटील, सादिक खाटीक, अरूण वाघमारे, पूजा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटील म्हणाले, प्रतीक पाटील यांनी टेंभूसाठी कोट्यवधींचा निधी आणला. त्यामुळे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच आटपाडीत पाणी आले होते. पण टेंभूसाठी खासदार निधी आणू शकले नाहीत. मात्र ते स्वतः पाणी आणल्याचा दावा करीत आहेत....

फोटो - http://www.pudhari.news/news/Sangli/Vasantdad-has-not-done-caste-politics-said-vishal-patil/1.jpg

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://www.pudhari.news/news/Sangli/Vasantdad-has-not-done-caste-politics-said-vishal-patil/

📲 Get Sanglinews on Whatsapp 💬