[jalgaon] - ए. टी. पाटलांनी निवडणूक लढवावीच: महाजन

  |   Jalgaonnews

जळगाव:

खूप चांगली कामे केली आहेत आणि लोक निवडून देतील असं वाटत असेल तर खासदार ए. टी. पाटील यांनी निवडणूक लढवूनच दाखवावी, असं खुलं आव्हान जलसंपदा मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिले.

भाजपच्या बैठकीसाठी गिरिश महाजन आज जळगावात आले होते. त्यावेळी जीएम फाऊंडेशन येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'आपण खूप मोठे काम केले आहे किंवा लोक निवडून देतील असे ए. टी. पाटील यांना वाटत असेल तर त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी आणि अनामत रक्कम वाचवावी, असं आव्हान त्यांनी दिलं. त्यांनी माझ्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यांना मी निवडणूक लढवण्याचं खुलं आव्हान देत आहे. धुळ्यात अनिल गोटे यांनाही मी आव्हान दिलं होतं. अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांच्याशी बोलणे झाले आहे. ते उमेदवारी अर्ज मागे घेतील, असंही त्यांनी सांगितलं....

फोटो - http://v.duta.us/9mD5OwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/IFO8ngAA

📲 Get Jalgaon News on Whatsapp 💬