[maharashtra] - पालघरमध्ये ठाकुर परिवार गुंडगिरी करतं- उद्धव ठाकरे

  |   Maharashtranews

पालघर : लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावलेला दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून रस्सीखेच सुरू आहे. कुठे उमेदवार पळवापळवी तर कुठे जागेवरून मित्र पक्षांमध्येच कलह देखील पाहायला मिळत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सत्ताधारी पक्षाला विविध मुद्दयांवरून घेरत आहे. तर भाजप-शिवसेनाही एकत्रित सर्वाला प्रत्युत्तर देत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसईतील नायगाव भागातून प्रचाराला सुरवात केली. प्रचारात त्यांनी ठाकुर कुटुंबियांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले.

ठाकुर परिवार गुंडगिरी करतो असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ठाकूर परिवारावर टीका करत उद्धव ठाकरेंनी अनेक सामाजिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन युतीच्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन ठाकरेंनी केलं वसईतल्या शिवसेना भाजप वाद संपलेला आहे. युतीचा धर्म पाळा असं आवाहन त्यांनी केलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी यावेळी चिमाजी आप्पा स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पुढे पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आज प्रसारित केलेल्या कॉग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे....

फोटो - http://v.duta.us/snQyCgAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/GzEqKQAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬