[maharashtra] - मावळ गोळीबाराचे आदेश मी दिल्याचे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन- अजित पवार

  |   Maharashtranews

मावळ : मावळ गोळीबार प्रकरणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार अधिक आक्रमक झाले पाहायला मिळाले. मावळ गोळीबाराचे आदेश अजित पवारांनी दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या आरोपांना अजित पवारांनी उत्तर दिले आहे. 'मावळ गोळीबाराचे आदेश मी दिल्याचे खरे ठरले तर अजित पवार राजकारणातून निघून जाईल' असे ते म्हणाले.मी माझी पुर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार असून माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचेही अजित पवारांनी यावेळी सांगितले. मी एक शेतक-याचा मुलगा आहे आणि जीवात जीव आहे तोपर्यंत शेतकऱ्या विरोधात कोणतही काम होणार नाही असेही ते म्हणाले.

नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत माझं त्यांना आवाहन आहे की मावळच्या संदर्भात मी जर कोणत्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असतील तर ते त्यांनी जाहिर करावं, असे आवाहन अजित पवारांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना केले. मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात कोणत्याही अधिका-याने जर सांगितलं की, गोळीबाराचे आदेश मी दिले होते आणि असं खर ठरलं मी राजकारणातून निघून जाईन असे अजित पवार म्हणाले. मी माझी पुर्ण राजकीय कारकीर्द पणाला लावायला तयार आहे. माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मी जर माझी कारकिर्द पणाला लावायला तयार आहे मात्र भाजपचे नेते कारकिर्द पणाला लावणार का??? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी नरेंद्र मोदींबद्दल बोलत नसून माझ्यावर आरोप करणार्‍या नेत्यांबद्दल बोलतोय असेही त्यांनी स्पष्ट केले.

फोटो - http://v.duta.us/eAtHswAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/35HIDwAA

📲 Get maharashtranews on Whatsapp 💬