[mumbai] - kirit somaiya: सोमय्या की कोटक? ईशान्य मुंबईचा तिढा कायम

  |   Mumbainews

मुंबई: शिवसेनेचा विरोध मावळला नसल्याने भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी अद्यापही जाहीर झालेली नाही. मुंबईत आजपासून निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी सोमय्या यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यातच पक्षश्रेष्ठीने नगरसेवक मनोज कोटक यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याने ईशान्य मुंबईतून सोमय्या लढणार की कोटक याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेली वक्तव्ये किरीट सोमय्यांना महागात पडत आहेत. शिवसेनेने सोमय्या यांच्या उमेदवारीस विरोध केला असून सोमय्या यांना तिकीट दिल्यास त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचा इशारा शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे सोमय्या यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आपल्या उमेदवारीला विरोध होऊ नये म्हणून सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मातोश्रीतून भेट नाकारण्यात आल्याने सोमय्या यांची पाचावर धारण बसली आहे. मात्र तरीह त्यातून तोडगा निघेल या हेतूने सोमय्या यांनी ईशान्य मुंबईत प्रचारास सुरुवात केली आहे....

फोटो - http://v.duta.us/kauUgwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/HeKZiAAA

📲 Get Mumbai News on Whatsapp 💬