[nagpur] - उष्माघाताचे दोन बळी उष्णतेच्या लाटेचा इशारा; दोन अनोळखी वृद्धांचे मृतदेह आढळले

  |   Nagpurnews

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

उन्हाळ्याची सुरुवात होताच शहरात दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विविध ठिकाणी रस्त्यावर दोन अनोळखी वृद्धांचे मृतदेह आढळून आल्याने या दोघांचा मृत्यू झाला उष्माघाताने झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यातील एक मृतदेह हा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील पीजी हॉस्टेलमागे रविवारी दुपारी आढळला. ही ६०वर्षीय व्यक्ती आहे. या मृतकाची ओळख पटलेली नाही. तसेच दुसरा मृतदेह हा खापरीतील मिहान पुलाजवळ आढळून आला. हा इसमसुद्धा अनोळखी असून त्याचे वय अंदाजे ५० वर्षे आहे. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अद्याप त्यांच्या मृत्यू कारण समजू शकले नाही. मात्र, हे उष्माघाताचे मृत्यू असू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या आठवड्यापासून विदर्भातील तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शहर तसेच विदर्भात अवकाळी पाऊस आणि ढगांचे वर्चस्व होते. या कालावधीत काही ठिकाणी गारपीटसुद्धा झाली. मात्र, मार्चच्या अखेरच्या आठवड्यापासून ही परिस्थिती बदलेली आहे. अचानक तापमानात वाढ होऊ विदर्भात उन्हाळ्याची अधिकृत घोषणा झाली आहे. ३१ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान नागपूर आणि विदर्भात उष्णतेची लाट असल्याचे हवामान खात्यातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे....

फोटो - http://v.duta.us/mVQNPwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/N5TehAEA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬