[nagpur] - Maharashtra Express: 'महाराष्ट्र' उशिरा, 'काझीपेठ' रद्द

  |   Nagpurnews

नागपूर:

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत सुरू असलेल्या देखभालीच्या कामांमुळे त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. या कामांमुळे जून महिन्यापर्यंत गोंदियावरून सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस जवळपास पावणे दोन तास उशिरा सुटणार आहे, तर अजनी- काझीपेठ - अजनी पॅसेंजर ६ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

५७१३५ अजनी- काझीपेठ ही पॅसेंजर गाडी ६ एप्रिल, तर ५७१३६ काझीपेठ अजनी पॅसेंजर ५ एप्रिलपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. संबंधित प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे.

त्याचप्रमाणे बिलासपूर विभागात सुरू असलेल्या कामामुळे महाराष्ट्र एक्सप्रेससह अन्य काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. एप्रिल ते जून या काळात दर बुधवारी गोंदिया व झारसुगुडा वरून सुटणारी ५८११८- ५८११७ गोंदिया- झारसुगुडा- गोंदिया पॅसेंजर बिलासपूर- झारसुगुडा- बिलासपूर दरम्यान रद्द राहील. एप्रिल ते जून या काळात ५८११२ इतवारी- टाटानगर पॅसेंजर दर शुक्रवारी इतवारी- झारसुगुडा दरम्यान, तर दर सोमवारी इतवारी- बिलासपूर दरम्यान रद्द राहील. एप्रिल ते जून या काळात गोंदियावरून सुटणारी ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियावरून १ तास ४० मिनिटे उशिरा सुटेल. त्याचप्रमाणे याच कालावधीत दर मंगळवारी गोंदियावरून सुटणारी ६८७४३ गोंदिया- इतवारी मेमू गोंदियावरून ३० मिनिटे उशिरा सुटेल. ५८८१६ तिरोडी- इतवारी पॅसेंजर ही गाडी १ तास तुमसर येथे थांबवून ठेवण्यात येईल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन दक्षिम पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे.

फोटो - http://v.duta.us/HQHmdAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/m1fkuwAA

📲 Get Nagpur News on Whatsapp 💬