[nashik] - लोकसभेचे भविष्य सांगा, २१ लाख मिळवा!

  |   Nashiknews

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सतराव्या लोकसभा निवडणुकीचे भविष्य वर्तवा, असे आव्हान देशभराच्या ज्योतिषांना देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २१ लाखांचे बक्षीस सोमवारी नाशिक येथे जाहीर केले. या आव्हानप्रक्रियेचा तपशील आणि वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल व ज्योतिष संस्था व व्यक्तींना ते व्यक्तिश: पाठवले जाईल, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. २०१४ च्या निवडणुकीतसुद्धा हे आव्हान दिले होते; पण कोणीही हे भविष्य वर्तवले नसल्याचेही त्यांनी सांगितले.

फलज्योतिषशास्त्र आहे, असा दावा करणाऱ्या मंडळींना समितीतर्फे नेहमीच आव्हान दिले गेले. काही वेळा आव्हान स्वीकारण्याचा दावा करून वाद-संवाद झाला; परंतु प्रत्यक्षात आव्हानप्रक्रिया सिद्ध झाली नाही. भविष्य वर्तवणाऱ्यांना जर आपले नाणे खणखणीत असेल तर भीती कशाला, असा प्रश्नही पाटील यांनी केला. गेल्या वेळी एकानेही सहभाग घेतला नाही. आता त्यांनी सहभाग घ्यावा, असे आव्हानही दिले आहे. या वेळी त्यांनी फलज्योतिष हे शास्त्र नाही तर थोतांड आहे. ही भूमिका घेऊन फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्या ज्योतिषांना ग्राहक कायदा लागू करा, अशी मागणी अंनिसने पुन्हा एकदा केली. यामुळे आपले भविष्य खरे ठरले नाही तर नुकसानभरपाई मिळण्याची संधी ग्राहकाला मिळेल, असेही त्यांनी सांगितले....

फोटो - http://v.duta.us/YtG9tAAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/J36uNwAA

📲 Get Nashik News on Whatsapp 💬