[thane] - Uddhav Thackeray: वसईतली गुंडागर्दी मोडून काढू- उद्धव

  |   Thanenews

पालघर :

'वसईकरांनो तुम्ही कुणाचेही गुलाम नाही. तुमच्यावर कुणी गुंडागर्दी करत असेल तर या गल्लीबोळातल्या गुंडांची मुजोरी सरकार म्हणून आम्ही मोडून काढू', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला लक्ष्य केले.

शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे यांनी पालघर मतदारसंघाचा दौरा केला. वसईत ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधतानाच त्यांनी वसई किल्ल्यावर जाऊन नरवीर चिमाजी अप्पा स्मारकाचेही दर्शन घेतले. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना उद्धव यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत निशाणा साधला.

विरोधकांनी आमच्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. दोन हिंदुत्ववादी पक्षांना भांडत ठेवून त्याचा फायदा घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण हा डाव आम्ही एकत्र येऊन हाणून पाडला आहे, असे उद्धव म्हणाले....

फोटो - http://v.duta.us/25xllwAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/c0zY3AAA

📲 Get Thane News on Whatsapp 💬