[ahmednagar] - उन्हाचा तडाखा

  |   Ahmednagarnews

म. टा. प्रतिनिधी, नगर

शहरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, उन्हाच्या दाहकतेने नगरकरांना हैराण केले आहे. आठवडाभरात कमाल तापमानात सहा अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. २२ एप्रिल रोजी नगरचे तापमान कमाल ३९ अंश सेल्सिअसवर होते, ते रविवार (२८ एप्रिल) रोजी ४५.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे नागरिकांसोबतच चारा छावणीवर असलेल्या जनावरांचेही हाल होत आहेत.

यंदा राज्यभर उन्हाचा तडाखा जाणवत आहे. नगर जिल्ह्यात तर एप्रिल महिना हा अवकाळी पाऊस व तीव्र उन्हाळा असा विरोधाभासी वातावरणाचा अनुभव देणारा ठरला. नगरकरांना या बदलत्या वातावरणाचा सातत्याने सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. गेल्या सात दिवसांमध्ये तर सातत्याने तापमानात वाढ होताना दिसत आहे. नगरमध्ये २२ व २३ एप्रिल असे दोन दिवस तापमान हे ३९ अंश सेल्सिअसवर होते. हे तापमान २४ एप्रिल रोजी चाळिशीपार गेले असून रविवारी तर नगरमध्ये ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे रविवारी दुपारनंतर तर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड, औरंगाबाद-नगर-पुणे या महामार्गावर सुद्धा वाहनांची तुरळक गर्दी दिसत होती. वाढत्या तापमानामुळे रविवारी सुट्टीच्या दिवसी अनेकांनी घरीच थांबणे पसंत केले. कामानिमित्त घरातून बाहेर पडणे ज्यांना गरजेचे होते, त्यांनी मात्र आपले काम सकाळी लवकर व सायंकाळी सहानंतर घराबाहेर पडून करण्यास प्राधान्य दिले....

फोटो - http://v.duta.us/YApgzQAA

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/uonrhwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬