[ahmednagar] - नऊ वर्षांतील तापमानाचा उच्चांक

  |   Ahmednagarnews

नगर : नगरमध्ये रविवारी गेल्या नऊ वर्षांतील एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. रविवारी नगरमध्ये तापमान ४५.१ अंश सेल्सिअसवर गेले होते. नगरला एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे विक्रमी तापमान ४८.२ अंश सेल्सिअस १० एप्रिल २०१० रोजी नोंदले गेले आहे. त्यानंतर सर्वाधिक तपमान रविवारी नोंदवले गेले. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात नगरमध्ये तापमान ४० अशांच्या आसपास होते. मागील आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या सात दिवसांची आकडेवारी पाहता नगरचे तापमान सातत्याने ४३ ते ४५ अंशाच्या दरम्यान राहात आहे. रविवारी तर नगरचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार रविवारी राज्यात अकोला येथे सर्वांत जास्त ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल चंद्रपूर येथे ४६.५ अंश सेल्सिअस, ब्रम्हपुरी येथे ४६.४, अमरावती येथे ४६, वर्धा येथे ४६, नागपूर येथे ४५.३ आणि यवतमाळ येथे ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. या सर्व विदर्भातील जिल्ह्यानंतर राज्यात नगरमध्येच सर्वात जास्त म्हणजेच ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. वर्ष २०१० नंतर गेल्या नऊ वर्षांत प्रथमच यंदाच्या वर्षी तापमान हे एप्रिल महिन्यातील विक्रमाच्या जवळपास गेले आहे....

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/6VcDJQAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬