[ahmednagar] - बांबु लागवडीबाबत कृषी विद्यापीठात कार्यशाळा

  |   Ahmednagarnews

म. टा. वृत्तसेवा, राहुरी

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात बांबू लागवड प्रकल्प विभागातर्फे मंगळवारी (३० एप्रिल) बांबू लागवडीवर बुद्धीमंथन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटकचे माजी सचीव ए. सी. लक्ष्मणा, व ग्रोमोर बायोटेक लि. होसूर (तमिळनाडू) चे संचालक डॉ. एन. बारथी उपस्थित राहणार आहेत. अमरावतीचे वनपाल सैद सलीम अहमद, बांबू सोसायटी ऑफ इंडिया,पुणेचे डॉ. हेमंत बेडेकर, प्रा. डॉ. ए. डी. राणे, शास्त्रज्ञ डॉ. व्ही. एम. इल्लोकर, डॉ. राहुल पाटील, मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी राजशेखर पाटील, संजीव करपे हे प्रगतशील शेतकरीही या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे बांबू प्रकल्पा संदर्भात सादरीकरण होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी दिली.

येथे संपूर्ण कथा वाचा— - http://v.duta.us/21fCFwAA

📲 Get Ahmednagar News on Whatsapp 💬